Shankarrao Gadakh

आ. शंकरराव गडाख युवा मंच

English |

" जलसंधारणातून मनसंधारण करणारा पाणीदार नेता शंकरराव गडाख "

फेसबुक अपडेट

इंस्टाग्राम अपडेट

युवा वर्गासाठी पुण्या – मुंबईच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या. सोनई, नेवासा येथे यशवंत स्टडी सर्कलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना स्पर्धा परीक्षेत उतरण्याची संधी उपलब्ध करून दिली यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना अवघ्या 4 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतल्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.तालुक्यातील गावा गावात महिला बचत गटांचे जाळे निर्माण करून महिलांना आर्थिक सक्षम होण्यास हातभार लावला.

निराधार महिलांना शिलई मशीन वाटप तसेच दरवर्षी विधवा महिलांना ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या वतीने मदत केली जाते.

कोरोना काळात शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात नियोजनबद्ध यंत्रणा राबविल्याने तालुक्यातील जनतेला आधार मिळाला. गोर गरीब कुटूंबाना कोरोना काळात घरपोहोच किराणा वाटप करून मदत केली. दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तपेढ्यांना रक्त उपलब्ध उपलब्ध करून दिले. गरजू रुग्णांना मदतीचा हात देऊन वैद्यकीय मदतीचा उपक्रम अखंड सुरू असतो. गावा, गावात नवीन आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना निधी उपलब्ध करून सुसज्ज रुग्णालये उभी केली.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीसारखे दिशादर्शक ठरणारे उपक्रम राबविले. मोरयाचिंचोरे गाव दत्तक घेऊन विविध उपक्रम राबवत कायापालट केला. संकल्प सध्या विवाहाचा, मान्यवरांना दरवर्षी कृतज्ञता पुरस्कार, मुलींचे दत्तक पालकत्व आदी उपक्रम राबवून सामाजिक दायित्व जपले जाते.

पांढरीपुल एमआयडीसी सुरू करण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली. विविध उद्योगांना औद्योगिक वसाहतीत प्रोत्साहन दिल्यामुळे तसेच नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपावारात कांदा मार्केट सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस मदत झाली शेतकऱ्यांच्या मुलांना व्यापारी बनवणारा आदर्श उपक्रम राबवला. नेवासा,कुकाना येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून

तरुणांना गाळे उपलब्ध करून दिले यामुळे बाजार पेठ फुलण्यास मदत होत आहे.मुळा सह साखर कारखाना,मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना तालुक्याच रोजगाराची सुविधा उपलब्ध करून देत स्वयपूर्ण केले.

शेतीच्या पाण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. मुळा साखर कारखाना, तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तब्बल 350 वर बंधारे, ओढे, नाल्यांचे खोलीकरण केल्याने साठवण क्षमता वाढून पाणीपातळी वाढली.गावा गावात साखळी बंधारे निर्माण झाल्याने शेतशिवार बहरला.

शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास हातभार लावला.मुळा ,भंडारादरा धरणाचे पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीला वेळेवर पाणी उपलब्ध होण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असतो.

वीज उपकेंद्राची, वीज रोहित्रांची संख्या वाढविल्याने दाब कमी होऊन सर्वत्र सारख्या दाबाने पूर्णवेळ वीज पुरवठा मिळू लागला. विजेचा लपंडाव थांबल्याने प्रामुख्याने शेतकरी, व्यावसायिकांना दिलासा मिळाला. गावा, गावात सिंगलफेज योजना प्रभावीपणे राबवली.

चला कनेक्ट करूया